वैराट गड हा गड वाई प्रांतात येणारा किल्ला आहे. वाई पासून ८ कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला एका दिवसात पाहून येऊ शकतो पायथ्याच्या गावापर्यंत जाणाऱ्या बसेस व इतर गाड्या यामुळे या परिसरातील भटकंती फारच सोपी आहे.
Vairatgad Fort, Vairatgad Fort Trek, Vairatgad Fort Trekking, Satara
इतिहास
वैराटगड हा शिलाहार राजा भोज ह्याने अकराव्या शतकात बांधला. शिवकाळातही किल्ला केवळ एक लष्करी ठाणे म्हणूनच वापरात होता. शिवरायांनी जेव्हा वाई प्रांत जिंकला तेव्हा ह्या परिसरातील वैराटगड, पांडवगड हे किल्ले देखील स्वराज्यात सामील करून घेतले . पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
गडमाथा फारच लहान आहे. गडावर थोड्याफार प्रमाणात काही पडक्या वस्तूंचे अवशेष आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस कड्याच्या खालच्या बाजूस पाच ते सहा टाकी आहेत. उजव्या बाजूस छोटी गुहा आहे. साधारणतः २० ते २५ पायऱ्या चढून आपण गडावर पोहचतो. डाव्या हातालाच मारुतीचे मंदिर आहे. तर मंदिराबाहेर सुद्धा मारुतीची एक मूर्ती आहे. आजुबाजूला काही प्रमाणात चौथरे दिसतात. गडाची तटबंदी अजूनही बऱ्याच प्रमाणात शाबूत आहे. गडावर एक सदर आहे. तिची रुंदी साधारण १० फूट आहे. गडाच्या प्रवेशद्वाराच्या विरुद्ध दिशेला कड्यामध्ये एक खाच आहे ह्यातून म्हसव गावाकडे उतरता येते. त्याच्या जवळच एक उंचवटा आहे. तेथे दगडावर अस्पष्ट असे लिखाण आहे. गडाच्या आजुबाजूला अनेक अवशेष इतस्थतः पसरलेले आढळतात. थोडे शोधकार्य केल्यास आणखी काहीतरी सापडू शकेल. गड फिरण्यास १ तास लागतो.
गडावर जाण्याच्या वाटा
गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. त्यासाठी व्याजवाडीला पोहचावे. वाई सातारा मार्गावर ४ कि.मी. वर कडेगाव पूल येथे उतरावे. येथून व्याजवाडी या गावात यावे. गावातून गडावर जाण्यास दोन वाटा आहेत. एक वाट चांगली मळलेली आहे. मात्र ही जरा फिरून जाते. तर दुसरी वाट डाव्या बाजूस नाकाडावरून जाते. साधारणतः या वाटेने १/२ तास गड गाठण्यास लाघतो. तर पहिल्या वाटेने १ तास लागतो. पुढे दोन्ही वाटा एकत्र मिळतात आणि १० मिनिटे गडमाथा गाठण्यास लागतो शेवटच्या टप्प्यावरची वाट प्रचंड निसरडी आहे. व्याजवाडीच्या विरुद्ध बाजूस ‘म्हसव’ नावाचे गाव आहे. या गावातून सुद्धा एक वाट आहे. मात्र ही वाट खूप निसरडी आहे.
गडावरील मारुती मंदिरात अंदाजे ८ ते १० जणांची राहण्याची सोय होते. गडावर गगनगिरी महाराजांचे शिष्य राहतात. त्यांच्याकडे २-४ जणांची जेवणाची सोय होते. जास्त लोक असतील तर जेवणाची सोय आपणच करावी. बारमाही पिण्याच्या पाण्याची सोय आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडे ५ ते ६ पिण्याच्या पिण्याच्या टाकी आहेत. गडावर जाण्यासाठी एक ते दीड तास लागतात.
राहाण्याची सोय
गडावरील मारुती मंदिरात अंदाजे ८ ते १० जणांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय
जेवणाची सर्व व्यवस्था आपण स्वतःच करावी.
पाण्याची सोय
बारमाही पिण्याच्या पाण्याची सोय आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडे ५ ते ६ पिण्याच्या पिण्याच्या टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ
गडावर जाण्यासाठी एक ते दीड तास लागतात.


Welcome to the Best Fort Trekkers Group in Maharashtra.



